Press "Enter" to skip to content

कर्जत मधील रक्तदान शिबिरात 50 जणांचे रक्तदान

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।

भारतीय जैन संघटना कर्जत, महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशन, कर्जत, रोटरी क्लब कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने संकल्प ब्लड बँक कल्याण यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 50 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.

सार्वजनिक रक्तदाता यांनी आयोजित केलेले कर्जत – खालापूर तालुक्यातील 430 वे रक्तदान शिबिर तर कोरोना काळातील 38 वे रक्तदान शिबिर होते.
येथील शनी मंदिर देवस्थानच्या रविकिरण सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनील सोहनी, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष हसमुख जैन, महाराष्ट्र क्लास ऑनर्स असोसिएशनचे राहुल खेडकर यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले.

याप्रसंगी हुसेन जमाली, सचिन ओसवाल, रणजित जैन, सुजित जैन, पोपटलाल ओसवाल, अरविंद जैन, विकास चित्ते, सतीश श्रीखंडे, अशोक ओसवाल आदी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष राजेश ओसवाल यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी यांनी रक्तदानाचे महत्व सांगून प्लाझ्मा साठी रक्तदान करण्याचे आवाहन केले. असजाद खान या तरुणाने सर्वप्रथम रक्तदान करून रक्त संकलनाचा शुभारंभ केला. हे त्याचे पहिलेच रक्तदान होते. रक्त संकलन करण्याचे काम संकल्प ब्लड बँक कल्याणच्या डॉ. सोनाली देसाई, राजशेखर नायर, कीर्ती सिंग, शिल्पा तोरसकर आदींनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.