Press "Enter" to skip to content

कष्टकरी नगरात गरजू गोरगरीबांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।

गुंज फाउंडेशन आणि स्पर्श फाउंडेशन यांच्यामार्फत रसायनी कष्टकरीनगर येथील कामगार वस्तीमध्ये गरजू अपंग, विधवा, वयोवृद्ध तसेच इतर नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव अतिशय तीव्र असल्याने ब्रेक द चैन या उपक्रमांतर्गत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लॉक डाऊन जाहीर केलेला आहे. त्यामुळे रोजगार उपलब्ध नसल्याने हाताला काम नसल्याने अनेक लोकांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे.
त्या अनुषंगाने गुंजी फाउंडेशन आणि स्पर्श फाउंडेशन पनवेल यांच्या वतीने थोडासा मदतीचा हात म्हणून 80 गरजवंतांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. उपस्थित स्पर्श फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन दाभाडे सर, जीवन पोटफोडे, ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ गायकवाड इतर गावातील मान्यवर उपस्थित होते. हे घडवून आणण्यात गुंज संस्थेचे समन्वयक राहुल, किशोर बनकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्वयंसेवक म्हणून राहुल, प्रमोद, नंदू यांचे सामान वाटपमध्ये सहकार्य लाभले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.