Press "Enter" to skip to content

केंद्र सरकार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीचे आंदोलन

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।

केंद्र सरकारच्या नाकर्ते धोरणामुळे पेट्रोल डीझेलच्या भावावाढीने उंच्यांक गाठला आहे. या भावावाढीचा परिणाम जनतेच्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर होत आहे. म्हणूनच जनतेच्या प्रश्नांची जाण असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीने केंद्र सरकारच्या या भाववाढ व महागाई विरोधात काल दि.16 मे रोजी आंदोलन छेडले होते.

वास्तविक हे आंदोलन रस्त्यावर उतरून होणे गरजेचे होते. परंतु कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सोशल डीस्टसिंग चे सर्व नियम पाळून त्या – त्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत हे आंदोलन करण्यात आले असे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष ॲड. रंजना धुळे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रायगड जिल्हा निरीक्षक ॲड. रूपाली दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा गीता पालरेचा यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात कर्जत तालुका अध्यक्षा ॲड. रंजना धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.

वाकस ग्रामपंचायत मधील नेवाळी तसेच वाकस या ठिकाणी तालुका अध्यक्षा ॲड. रंजना धुळे यांच्या नेतृत्वाखाली तर पळसदरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या रायगड जिल्हा महिला उपाध्यक्षा पुजा सुर्वे नेतृत्वाखाली सुवर्णा सुर्वे, पिंकी पवार, सुरेखा वाघमारे, प्रियंका पवार, शैला वाघमरे, सूरेखा, देवकी यांनी तसेच कर्जत शहरातील वॉर्ड क्रमांक 6 मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा, नगरसेविका पुष्पा दगडे यांच्या मार्गदर्शनाखाली, वॉर्ड क्रमांक 2 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुवर्णा निलधे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.