Press "Enter" to skip to content

आमदार निधीतून तळेगाव व चांभार्लींत विकासकामांचे भूमिपूजन

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।

आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत वासांबे पंचायत समिती गणातील तळेगाव आणि रिस पंचायत समिती गणातील चांभार्लीं येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा माजी आमदार देवेंद्र साटम व भाजपाचे खालापूर तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

सर्वप्रथम तळेगाव येथे विभागीय अध्यक्ष सचिन तांडेल यांच्या घरासमोर तळेगाव ते पानशिल या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.तलेगाव ते पानशिल हा रस्ता जवलपास 720 मीटर लांबीचा डांबरीकरण रस्त्यासाठी 20 लाखाचा आमदार निधी उपलब्ध झाला आहे.यावेली कोरोना पाश्र्वभूमीवर सोशल डिस्टिंक्शनचे पालन करण्यात आल्याचे दिसून आले.तर चांभार्ली येथील मुख्य रस्ता चंद्रकांत जांभले ते नामदेव मुंढे या 150 लांबीच्या रस्त्याचे काॅक्रीटीकरण,तर वामन मुंढे ते अनंता पाटील या घरापर्यंत सा़डपाणी गटार बांधकामाचे भूमिपूजन माजी आमदार देवेंद्र साटम व रामदास ठोंबरे यांच्याहस्ते करण्यात आले.

चांभार्ली येथील रस्त्यासाठी पाच लाखाचा तर सांडपाणी गटारासाठी 2लाख 99 हजार रुपये आमदार निधी उपलब्ध झाला आहे.यावेळी माजी आमदार देवेंद्र साटम, तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे,सरपंच ताईं पवार, सरपंच बाली कातकरी, उपसरपंच प्रतिप पाटील,विभागीय अध्यक्ष सचिन तांडेल,माजी उपसभापती गजानन मांडे,माजी उपसरपंच अमित मांडे, पंचायत समिती विभागप्रमुख आकाश जुईंकर, पोलिस पाटील अनंता पाटील, ग्रामपंचायत सदस्य जयराम पाटील, नारायण तांडेल,चेतन जाधव,सुदाम कडपे,भरत मांडे,दिलीप पाटील, विशाल मुंढे,तुकाराम मुंढे,प्रविण जांभळे, नंदूकुमार कुरंगले, ग्रामविकास अधिकारी कांबळे साहेब,प्रविण कालबागे,दत्तात्रेय जांभळे, वासुदेव जांभळे, तुकाराम मुंढे, सीताराम मुंढे,कमळू मुंढे,हरिभाऊ जांभळे,नारायण जांभळे, प्रमोद जांभळे, धनाजी जांभळे,किरण मुंढे,नागेश कुंभार,अजित जांभळे, ज्ञानेश्वर जांभले आदि उपस्थित होते.मे महिनाअखेर वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत खोलंबलेल्या इतर विकासकामेही सुरू होणार असल्याचे विभागीय अध्यक्ष सचिन तांडेल यांनी बोलताना सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.