Press "Enter" to skip to content

वडगांव ग्रामपंचायतीकडून विविध विकासकामांची सुरुवात

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।

खालापूर तालुक्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत वडगांव हद्दीत विकासकामांची धडाकेबाज कामगिरी सुरू असून विकासकामांमुळे नागरिकांत समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.

मौजे वाशिवली येथे सोमनाथ जाधव ते रघुनाथ शिवले यांचे घरापर्यत गटार दुरूस्ती करणे या कामाचे भुमिपूजन ग्रुप ग्रामपंचायत वडगांवच्या विद्यमान सरपंच गौरी महादेव गडगे यांच्याहस्ते करण्यात आले.

तर ग्रुप ग्रामपंचायत वडगांव हद्दीतील मौजे वाशिवली येथील गोकूळ आळीतील ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ग्रामपंचायतीने मार्गी लावला आहे.सदर ठिकाणच्या ग्रामस्थांना बऱ्याच वर्षापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवत होता .

ग्रामपंचायतीच्या प्रयत्नातून सदर गोकूळ आळीमध्ये नवीन पाईप लाईन टाकणेत आली असून सदर ठिकाणी पाण्याचा पुरवठा सुरळीत केला आहे.विकास कामे झाल्याने नागरिकांनी ग्रामपंचायतीचे आभार मानले यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी शिंदे ,राजेश पाटील , महादेव गडगे ,संदेश मालकर तसेच संतोष पाटील , दशरथ पाटील रघुनाथ शिवले ,दामू गायकर , अशोक शिवले , जगदिश शिवळे ,संदिप शिंदे, जयेश तुपे सोमनाथ जाधव,सोमनाथ गोधळी,हरेश पाटील , नंदकुमार पाटील ,संतोष गडगे , मदन ठोंबरे ,सुरेश साळूंके,संजय साळूके , संदीप शिंदे ,सुनिल पवार , संतोष पवार ,महेंद्र पाटील ,प्रमोद जोशी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.