सिटी बेल । पाली । धम्मशील सावंत ।
सुधागड तालुक्यातील वऱ्हाड-जांभूळपाडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी महेश गिरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रद्धा कानडे यांच्या अध्यक्षखाली ही निवडणूक पार पडली.
यावेळी बोलताना महेश गिरी म्हणाले की उपसरपंच पदावरून जनतेच्या विविध प्रश्न व समस्यांना न्याय देण्याचे काम करण्यावर भर देईन. गावाचा सर्वांगीण व शाश्वत विकास करण्याच्या दृष्टीने वरिष्ठ नेतेगण , ग्रामपंचायत सहकारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य घेऊन अधिक अधिक विकास कामांना प्राधान्य दिले जाईल.
यावेळी माजी सरपंच गणेश कानडे, रविंद्र खंडागळे, संतोष जोरकर, ग्रामसेवक सचिन केंद्रे, मिलींद बहाडकर, राजेश सिगांडे, विशाल गुरव, दादा बामुगेड, अनता साळुंखे, काशिनाथ पवार, नामदेव वारे सदस्य सुनिल वाघमारे ताई वारे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मान्यवर व नागरिकांनी नवनिर्वाचित उपसरपंच गिरी यांना शुभेच्छा दिल्या.








Be First to Comment