सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
दिवसेंदिवस वाढत जाणारी उष्णता व कोरोनामुळे पुकारलेल्या लाँकडाऊनमुळे कुठे जाणे येणे नसल्याने सुट्टीचा उपभोग घेता यावा यासाठी बच्चे कंपनी पोहण्याचा आनंद लुटत असताना दिसत आहेत.
कोरोनाने सर्वत्र हाहाकार उडविल्याने चालू शैक्षणिक वर्षातही शाळांना सुट्टी देऊन मुलांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लाँकडाऊन पुकारल्याने हिंडण्या-फिरण्यावर निर्बंध आले आहेत. तर कोरोनाच्या प्रादुर्भावापासून दूर राहता यावे यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने काळजी घेऊन कोरोनाचे नियमावलीचे पालन करताना दिसत आहेत. तर दरवर्षी मे महिन्याची सुट्टी म्हणजे मौजमजेचे सुट्टी ठरते.सुट्टीत विविध बेत आखले जातात.
मे महिन्याची सुट्टी आणि मामाचे गाव यांचे तर पुर्वापार ऋणानुबंधनाचे नाते.त्यामुळे सर्रास मुले सुट्टीत मामाच्या गावाला जातात किंवा अन्य नातेवाईक यांच्याकडे जातात.तर काहीजण कुटूंबासोबत दूरच्या प्रवासाला जातात.परंतू गतवर्षपासून कोरोनामुळे सर्वांच्याच हौसेमौजेवर पाणी फेरले असल्याने सुट्टीचा उपभोग घेता यावा यासाठी मुले जमेल त्या वेळेत पोहण्याचा आनंद लुटत असल्याचे दिसून येत आहेत.तसेच विविध बैठे खेळ,सांघिक खेळ खेळणे,टिव्हीववर आवडत्या मालिका पाहणे,मोबाईलवर गेम्स खेळणे आदी मनोरंजनाचे साधनातून विरंगुळा मिळवित आहेत.तर सांघिक खेळ व क्रुती करताना सामाजिक सुरक्षिततेच्या नियमांचेही पालन करताना दिसत आहेत.या सर्व विरंगुळ्यांच्या साधनात विशेष करून मुले तलाव, नदी,विहिरी आदी ठिकाणी मनसोक्तपणे पोहण्याचा आनंद लुटण्याला पहिली पसंती दर्शवित असल्याचे दिसून येत आहे.








Be First to Comment