सिटी बेल । उरण । सुनिल ठाकूर ।
स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांजी जयंती सोहळा छावा प्रतीष्ठान चिरनेरच्या सदस्यांनी घरा घरात अगदी साधेपणाने साजरा केला.
गेले कित्येक वर्ष छावा प्रतिष्ठान चिरनेर तर्फे संभाजी महाराज जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करत आले आहेत.
माहाराष्ट्रात साजर्या होणार्या काही महत्वाच्या छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळ्या पैकी छावा प्रतीष्ठान साजरा करत आसलेला हा सोहळा प्रसिद्ध आहे.हा सोहळ्यात सहभागी होताना व पाहताना एक वेगळाच उत्साह संचारतो. परंतू लागोपाठ गेले दोन वर्ष कोरोना महामारीमूळे हा सार्वजनीक सोहळा रद्द करण्यात येत आहे.व घराघरात छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतीमेचे पूजन करुन शंभूराजांना मानवंदना देण्यात येते. या वर्षी देखील सार्वजनिक सोहळा रद्द करुन छावा प्रतीष्ठानच्या सदस्यांनी घरातच शंभूराजांच्या प्रतीमेचे पूजन करुन जयंती सोहळा साजरा केला.








Be First to Comment