Press "Enter" to skip to content

ग्रामसेवक सचिन पाटील यांचा पत्रकार परिषदेत गंभीर आरोप

मारहाणीचा गुन्हा मागे घेण्यासाठी उपोषणाअंतर्गत माझ्यावर दबावतंत्राचा वापर

सिटी बेल । पेण । वार्ताहर ।

पेण तालुक्यातील काराव ग्रामपंचायतीत 2017 मध्ये रूजू असतांना माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेऊन माझ्या विरोधात ग्रामपंचायत सदस्या यांनी पेण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या कडे तक्रार केली. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीची तपासणी केली असता त्यात काही त्रुटी आढळून आल्याने त्यात माझ्यावर कारवाई करीत मला निलंबित केले असल्याचे ग्रामसेवक सचिन पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

तर यात सदर सदस्या यांचे समाधान न झाल्यामुळे त्यांनी हेतुपुरस्सर एकदा गटविकास अधिकारी यांच्या कडे असताना त्यांच्या पतीने मला मारहाण केली होती याबाबत मी त्यावेळी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली व त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता ते प्रकरण आता न्यायालयात सुरु आहे.मात्र हे प्रकरण मागे घेण्यात यावे याकरीता माझ्यावर दबावतंत्र टाकण्यासाठी त्या जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणास बसलेल्या होत्या त्यामुळे यात मला जाणुन बूजून बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ग्रामसेवक सचिन पाटील सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.