कुस्तीचा आखाडा कुस्ती विना राहीला सुना
सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।
कर्जतकरांचे ग्रामदैवत श्री धापया महाराजांची अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक वर्षांपासून होणारी जत्रा यंदाही कोरोनाच्या संकटामुळे रद्द करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला होता. त्यामुळे त्या निमित्ताने शंभर वर्षांहून जास्त परंपरा असलेली कुस्ती स्पर्धा सुद्धा रद्द करण्यात आल्याने यंदाही हा आखाडा कुस्ती विना सुना राहीला.
कर्जतकरांचे ग्रामदैवत श्री धापया महाराजांची अक्षय तृतीयेला दोन दिवसांची जत्रा असते. लघुरुद्र, अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम करून संध्याकाळी कर्जत शहरातून श्री धापया महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात येते. दिवसभर सर्व धर्मीय आपल्या ग्रामदैवताचे दर्शन घेतात. मात्र गेल्या वर्षी पासून कोरोना महामारीचे संकट असल्याने ही यात्रा रद्द करण्यात आली असल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेंद्र बबन चंदन यांनी सांगितले.
अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी कुस्तीचा आखाडा असतो. या आखाडयाची शंभर वर्षांहून अधिक परंपरा आहे. येथे कुस्त्या खेळण्यासाठी स्थानिकांसह जिल्हा, राज्य नव्हे तर देशभरातून पहेलवान येथे येत असतात. इतका प्रसिद्ध हा आखाडा आहे असल्याचे चंदन यांनी सांगितले.
Be First to Comment