Press "Enter" to skip to content

कोविड रुग्णांसाठी विविध अत्यावश्यक साहित्याचे वाटप


राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचा स्तुत्य उपक्रम

सिटी बेल । कोलाड । कल्पेश पवार ।

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथ.विभाग रोहा शाखेने तालुक्यातील विविध प्राथ.आरोग्य केंद्रात कोविड रुग्णांसाठी विविध अत्यावश्यक साहित्याचे वाटपाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.कोविड काळात त्यांनी राबविवेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असते.त्याप्रमाणे राष्ट्रहित, विद्यार्थीहित,शिक्षणहित आणि शिक्षकहित संघटनेचे ब्रीद वाक्य आहे.ज्या ज्या वेळेस देशावर संकटे आले त्या वेळेस परिषदेचा प्रत्येक कार्यकर्ता हिरीरीने राष्ट्रीय कार्यात धाऊन गेलेला आहे.त्याच बांधिलकीचे नात्यातून राजेश सुर्वे राज्याध्यक्ष व संजय निजापकर जिल्हाध्यक्ष यांच्या संकल्पनेनुसार संपूर्ण रायगड जिल्हाभरात संघटनेच्या वतीने वैद्यकीय उपकरणे व साहित्य विविध ठिकाणी वाटप सुरू करण्यात आले आहे.

या उपक्रमाअंतर्गत ता.१० रोजी म.रा. शि.प.रोहा यांच्या वतीने उप जिल्हा रुग्णालय रोहा व प्रा.आरोग्य केंद्र आंबेवाडी. कोकबन.नागोठणे.येथे नं.मास्क, हँण्डग्लोज. फेस शिल्ड. सँनीटायझर. स्ट्रीमर .हँण्डवॉश इ.किटचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी उप जिल्हा रुग्णालय रोहा अधीक्षक डॉ. अंकिता खैरकर, उपसभापती रामचंद्र सकपाळ,पं.स. सदस्य शिद्धी संजय राजीवले,बीडीओ प्रथम श्रेणी किरण पाटील बीडीओ पंडित राठोड,ग. शि. अ. सादूराम बांगारे, प्रशासन अधिकारी कवितके, आंबेवाडी सरपंच सुरेश महाबळे,उपसरपंच श्रीकांत चव्हाण उपस्थित होते तसेच कोकण विभाग प्रतिनिधी उमेश महाडेश्वर, तालुका अध्यक्ष खेमसिंग चव्हाण, कार्यवाह सुभाष कांबळे,आशिष पवार,सुदाम लांडे, जिल्हा प्रतिनिधी प्रदीप खाडे,गजानन जाधव,नंदकुमार तेलंगे ,अमोल राठोड. बडे सर,नाईकडे सर,ढवळे सर आदी उपस्थित होते.

या राष्ट्रीय कार्यात रोहा तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचे नात्यातून आपत्तीकाळात राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होताना दिसत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.