Press "Enter" to skip to content

मित्र

मित्र

जलदांच्याही कळपामध्ये
हळूच डोके वरती घेतो
मिनाराच्या भालावरती
तिलक करून निघून जातो

कसे असावे आपलेच ते
पुनः प्रश्न विचारत जातो
गर्दीत राहूनही आपले
वर्चस्व वेगळे सांगून जातो

काय म्हणावे कसे उमजते
प्रश्ना मागे एक उत्तर देतो
विसाव्याला क्षितिजावरती
अलवार पणे झुकून जातो

कोण आहे काय आहे
हरएक आतो समजून जातो
सूर्यदेव तो देव म्हणूनही
सर्वस्व त्याचे वाटुन जातो

नभावरच्या छटांनाही
हेच कार्य लेखुन देतो
निसर्गाचे चक्र सारे
फिरवायला पुन्हा उगवतो

  • स्वानंद नंदकुमार मराठे, पुणे
    .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.