Press "Enter" to skip to content

रोह्यातील कोरोना रुग्णांना आ.महेंद्र दळवींकडून ऑक्सिजन कॉंन्सेंट्रेटर भेट !

सिटी बेल । धाटाव । शशिकांत मोरे ।

रोह्यातील कोरोना रुग्णांसाठी अलिबागचे आ.महेंद्र दळवी यांच्याकडून रोह्यातील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन कॉंन्सेंट्रेटर लोकार्पण करण्यात आले.

आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांच्या मदतीसाठी ऑक्सिजन कॉंन्सेंट्रेटर मुळे उपचारासाठी तातडीने मुंबई, पुण्यात जाणाऱ्या रुग्णांना आता चांगलाच दिलासा मिळाला आहे.

उपजिल्हा रुग्णालयातील अधीक्षक सौ खैरकर मॅडम यांनी रुग्णालयात ऑक्सिजन कॉंन्सेंट्रेटरची अत्यंत आवश्यकता असल्याचे वारंवार सांगितले होते.हीच समस्या लक्षात घेत समाजसेवा हाच ध्यास असलेले शिवसेनेचे आमदार महेन्द्रशेठ दळवी यांनी रोहा शिवसेना तालुका प्रमुख समिर शेडगे यांच्या माध्यमातून लोकार्पण करण्यात आले.याप्रसंगी शिवसेनेच्या रोहा तालुका महिला आघाडी प्रमुख निता हजारे,शहर आघाडी प्रमुख समीक्षा बामणे, वृतुराज अष्ठीवकर यांसह रुग्णालयातील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.यामुळे गरिब व गरजू कोरोना रुग्णांना याचा मोठा लाभ होणार आहे.

आ.महेंद्र दळवींकडून ऑक्सिजन कॉंन्सेंट्रेटर लोकार्पण बाबत दळवी यांची असंख्य रोहेकर नागरिकांनी वाहवा केली असून नागरिक वर्गाने आनंद व्यक्त केला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.