खासदार बारणे व आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली झाली बैठक संपन्न
सिटी बेल । खालापूर । विकी भालेराव ।
तालुक्यातील खोपोली येथे कोव्हीड केअर रुग्णालय उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू असताना येथील स्थानिक उद्योग पती यांनी स्वतः पुढाकार घेऊन कोव्हीड रुग्णालय उभारणीसाठी मदतीचा हात दिला आहे.
त्यासंदर्भात आज खालापूर तहसील कार्यालयात खास.श्रीरंग आप्पा बारणे व आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. सध्या रायगड जिल्ह्यात खालापूर, खोपोली सह कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच दोन्ही तालुक्यात सूसज्ज असे रुग्णालय नसल्याने येथील रुग्ण पनवेल, वाशी, मुंबई येथे उपचारासाठी जात असतात मात्र कोरोना सारख्या महाभयंकर रोगाला सामोरे जात असतानाच आक्सिजन व व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होत नाहीत,अशातच येथील परिस्थिती चा अंदाज घेऊन स्वतः आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी आपल्या आमदार निधीतून सुमारे पन्नास लाख रुपये देणगी दिली आहे.
खालापूर-खोपोली शहरात रोजच शेकडो ने कोरोना पॉझिटिव्ह संख्या वाढत आहे,तर एकीकडे त्यांना उपचार करण्यासाठी हॉस्पिटल व बेड उपलब्ध होत नाहीत, अशातच मावळचे खासदार बारणे व स्थानिक आमदार थोरवे यांनी या संदर्भात स्थानिक नगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याशी वेळोवेळी बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला, त्यात येथील नागरिक व प्रशासन कोव्हीड रुग्णालय उभारणीसाठी तयार असल्याने एक पॉझिटिव्ह भूमिका ठेवून आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी आपल्या आमदार निधीतून सुमारे पन्नास लाख रुपये रुग्णालय उभारणी साठी दिले तर खालापूर तालुक्यातील उद्योगपती यांनी या रुग्णालयाला स्वतःहून हातभार लावण्याचे कबूल केले असून त्या संदर्भात पुढील उपाययोजना करण्याचे आदेश खासदार व आमदार यांनी तहसीलदार इरेश चप्पलवार यांना दिले.
सदर बैठकीला खास.बारणे,आम.थोरवे यांच्यासह खोपोली नगराध्यक्षा सुमनताई औसरमल,माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे,राजेंद्र येरूणकर,अनिल मित्तल,म्हात्रे, व अधिकारी वर्ग उपस्थित होते.








Be First to Comment