Press "Enter" to skip to content

शंकर हिराजी पाटील यांची पुण्यतिथी साधे पध्दतीने साजरी

सिटी बेल । पेण । वार्ताहर ।

स्वर्गीय शंकर हिराजी पाटील यांची तिसरी पुण्यतिथी साधे पद्धतीने साजरी करण्यात आली.कोरोनाचे प्रादुर्भाव असल्याने शासकीय नियमांचे पालन करून नातेवाईकांनी कोणीही येऊ नये असे पाटील परिवाराकडून सांगण्यात आले होते.

शंकर पाटील हे मूळचे सोनखार गावचे रहिवाशी असून ते पेणमध्ये शिक्षक सोसायटी येथे स्थायिक झाले होते. ते महाराष्ट्र शिक्षक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष, माजी पदोन्नती मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष, पेण माजी शिक्षक संघटनेचे संस्थापक, अखिल महाराष्ट्र सेवानिवृत्त संघटनेचे पदाधिकारी असे नाना पदे त्यांनी भूषविली होती.

शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी ते नेहमीच प्रयत्नशील असत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकीत त्यांचा पुत्र प्रविण पाटील यांनी समाजसेवेचा वसा सुरू केला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.