Press "Enter" to skip to content

पेणच्या ग्रामीण भागात लसीकरण सूरू करावे : प्रवीण पाटील

सिटी बेल । पेण । वार्ताहर ।

कोरोना लसीकरणासाठी पेण मधील होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने तालुक्यातील ग्रामीण भागात लसीकरण केंद्र सुरु करावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार व पेण नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना 22 एप्रिल रोजी निवेदन देऊन मागणी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेऊन तालुक्यातील हमरापूर तसेच वाशी भागात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

पेण तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लसीकरण केंद्र वाढविणे महत्वाचे होते त्याबद्दल प्रवीण पाटील यांनी मुख्यमंत्री साहेबांसह सर्वांचे आभार मानले. जिल्हा अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांचे प्रत्येक वेळी मोलाचे सहकार्य लाभत असल्याने प्रवीण पाटील यांनी त्यांचेही विशेष आभार मानले असून लवकरात लवकर पेण शहरातील सोसायट्या,वार्ड या ठिकाणी लसीकरण केंद्र उभारावेत यासाठी प्रताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या सोबत चर्चा केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.