Press "Enter" to skip to content

राजिप शाळेच्या शिक्षकांकडून मदतीचा हात

आरोग्य केंद्र खालापूर वोवोशी, लोहोप,चौक,पंचायत समिती खालापूर येथे वैद्यकीय साहित्य वाटप

सिटी बेल । काशिनाथ जाधव ।
पाताळगंगा ।

कोरोना नियंत्रण आण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्न शिल असून,एकीकडे लसीकरण सुरु असून दुसरीकडे दानशूर व्यक्ती शक्य होइल त्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे.मात्र मुलांच्यावर चांगले संस्कार करुन त्यांना ज्ञानअमृत पाजणारे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद राजिप शाळेतील शिक्षकांनी, प्राथमिक आरोग्य केंद्र खालापूर वोवोशी, लोहोप, चौक आणि पंचायत समिती खालापूर शिक्षण विभाग यांना कोविड आपत्ती निवारण सहाय्यता वैद्यकीय साहित्य देण्यात ऑक्सीमीटर, N B95 मास्क, सॅनिटायझर ग्लोज,फेस शिल्ड, सॅनिटायझर स्प्रे इत्यादी साहित्य खालापूर वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे देण्यात आले.

दिवसेंदिवस कोरोना कोरोना नियंत्रणणांत आण्यासाठी विविध माध्यमातून काम करीत असलेले शासकीय,राजकीय कार्यकर्ते प्रयत्न करीत आहे.की आपण सर्वांनी किरोना या विषाणू हद्दपार करण्यासाठी कंबर कसली आहे.त्याच बरोबर डॉक्टर हे सातत्याने रुग्णाच्या संपर्कात येत असतात.यामुळे त्यांना सातत्याने या सुरक्षा साहित्यांची आवश्यकता भासत असते.या बाबीचा विचार करून शिक्षक संघटनेने एक सकारात्मक विचार करुन एक पाऊल पुढे टाकून आपण सुद्धा काही तरी करावे या विचारांतून त्यांनी हे सुरक्षतेचे साहित्य वाटप करण्यात आल्यांचे सांगितले.

यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे खालापूर तालुकाअध्यक्ष मधुकर बैसाणे, ,सरचिटणीस(कार्यवाह) राजाराम जाधव,कार्यध्यक्ष नंदा मोहिते सर ( केंद्रप्रमुख सावरोली),जिल्हा उपाध्यक्ष, दीपक खाडे सर ,केंद्रप्रमुख देवन्हावे अनिल म्हात्रे सर ,सुधीर घोडके सर,म.रा.प्रा.शि.प कार्यालयीन चिटणीस भगवान घरत,कर्जत तालुका अध्यक्ष मोहन पाटील सर,रा.जि. कोशाध्यक्ष सुशील वाघमारे सर,खालापूर तालुका उपाध्यक्ष महेंद्र जाधव ,शशिकांत चव्हाण सर इत्यादी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधिकारी च्या हस्ते वाटप करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.