Press "Enter" to skip to content

शेकाप तालुका चिटणीस राजेश केणी यांच्या मागणीला यश

पनवेलमध्ये प्लासमा लॅब सुरू करण्यासाठी शेकापच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यानंतर एम.जी.एम हॉस्पिटलचे डीन. नरशेट्टीं यांना निवेदन

सिटी बेल । पनवेल । सुनिल ठाकूर ।

शेकाप तालुका चिटणीस राजेश केणी यांनी पनवेल मधील कोरोना रुग्णाच्या दृष्टीकोनातून प्लासमा साठी होणारी गैरसोय दुर होण्यासाठी एम.जी.एम हॉस्पिटलचे डीन. नरशेट्टीं यांची भेट घेऊन एम जी एम लॅब मध्ये प्लाझ्मा सेंटर पुन्हा एकदा सुरू करण्याची विनंती निवेदनाद्वारे दिली, त्याला एम जी एम चे प्रमुख नरशेट्टी यांनी देखील दुजोरा दिला आहे मात्र शासकीय नियमांना अधीन राहून आपण हे काम पुनश्च सुरू करू असं सांगितलं.

मात्र डॉक्टर नरशेट्टी यांनी प्लासमा थेरफी प्रत्येक रुग्णास उपयुक्त ठरतेच अस नाही असं मत राजेश केणी यांच्याशी बोलताना सांगितले, राजेश केणी यांनी विविध हॉस्पिटलमधून डॉक्टर्स च्या वतीने प्रिस्क्रिपशन मध्ये प्लाझ्मा साठी सल्ला दिला जात असल्याचे म्हटले आणि आपण दिलेल्या शब्दाप्रमाणे लवकरात लवकर एम जी लॅब मधून प्लासमा सेंटर सुरू करून पनवेल रायगड करांची प्लासमा साठी मुंबई, पुणे साठी धावपळ वाचवावी अस सांगितलं.

या चर्चेत राजेश केणी यांनी उपसभापती असताना आशा वरकर्स साठी प्रशिक्षण शिबीर एम जी एम मध्ये आयोजित केल्याची आठवण करून दिली.
राजेश केणी यांची मागणी एम जी एम प्रशासनाने मान्य केलेली असून पाहूया किती लवकर ही लॅब प्लाझ्मा च्या दृष्टीने काम सुरू करते हे महत्त्वाचं ठरेल.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.