सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
बहुचर्चेत असलेल्या रोहा-कोलाड या राज्य महामार्गाचे कारपेट रस्त्याचे काम पुर्णत्वाचे मार्गावर आल्याने प्रवासीवर्ग व वाहनचालकांना चांगलाच दिलासा प्राप्त झाला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याचे कामाचे फक्त खड्डे बुझविण्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे काम केले नसल्याने या मार्गावरील खड्ड्यांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली होती. तर पावसाळ्यात या मार्गावर प्रवास करणे म्हणजे जीवावर बेतल्यासारखेच असायचे.
मार्गाचे दुरावस्थेमुळे आतापर्यंत विविध छोटे मोठे अपघाताचे प्रसंगही घडले आहेत. तर या मार्गावरील वाहतुकीचा विचार करता खराब मार्गामुळे प्रवास करणे मोठे जिकरीचे असायचे.तर गत पावसाळ्यात या मार्गाची दुरावस्था पाहता तसेच प्रवासीवर्ग व वाहनचालकांना होणा-या त्रासाचा विचार करता स्थानिक खासदार, आमदार व अन्य लोकप्रतिनिधी तसेच प्रांताधिकारी व तहसिलदार व संबंधित विभागाचे अधिकारी वर्ग यांना तालुक्यातील विविध संघटनांनी वेळोवेळी लक्ष वेधित करून अखेर दिपावलीनंतर खड्डे बुझविण्याचे काम पुर्ण करण्यात आले होते.खड्डे बुझवून सहा महिने पुर्ण होऊन व पावसाळा ऋतू तोंडावर येऊन देखील या वर्षीही खड्ड्यातूनच प्रवास करावा लागतोय की काय ? अशाप्रकारची भिती वाटत असतानाच अखेर या मार्गावर
कारपेट टाकण्याचे काम सुरू करून व सद्यस्थितीत या मार्गाचे कारपेटचे काम पुर्णत्वाचे मार्गावर असून लवकरच पुर्ण होईल असे दिसत असल्याने सर्वांना दिलासा प्राप्त झाला आहे.
या मार्गावरील कारपेटमुळे आता प्रवासी वर्ग व वाहनचालकांचा विनासायास प्रवास तर होणार आहेच याशिवाय वेळ,इंधन व आर्थिकही बचत होणार आहे.








Be First to Comment