अविश्वास ठरावा विरोधात अपीलात जाणार — सरपंच राजेश मोकल
सिटी बेल । पेण । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील प्रतिष्ठेची मानली जाणारी वडखळ ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश मोकल यांच्याविरुद्ध ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांनी 6 मे रोजी अविश्वासाचा ठराव दाखल केला होता. त्या अनुषंगाने आज पिठासन अधिकारी तथा पेण तहसीलदार अरुणा जाधव यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा घेण्यात आली.यावेळी सरपंच राजेश मोकल यांच्या विरोधात 13 विरुद्ध ठराव मंजूर करण्यात आला.

यामध्ये सरपंच राजेश मोकल हे सदस्यांना विश्वासात घेत नसून विकासकामेही करत नाहीत तसेच सरपंच यांचा मनमानी कारभार चालू असून मासिक सभेत झालेल्या ठरावाची अमंलबजावणी न करणे असे अनेक मुद्दे त्यांच्या विरोधात सदस्यांनी मांडून सरपंच यांच्यावर विश्वास ठराव पास केला.मात्र मागिल तीन वर्षांत आपण गावात अनेक विकासात्मक कामे करून जेएसडब्ल्यु कंपनीच्या सीएसआर फंडातून सुद्धा कामे केली आहेत मात्र 15 व्या वित्त आयोगातील कामांना प्रशासनाकडून मंजूरी न मिळाल्याने ती कामे राहिली आहेत.त्यामुळे माझ्यावर दाखविलेला अविश्वास ठराव बिनबुडाचा आहे यालट काही सदस्य बेकायदेशीर कामे करण्यास सांगत असून आम्हाला दरमहा आर्थिक लाभ देण्यात यावा अशी मागणी करीत आहेत मात्र आपल्याला जनतेने निवडून दिले आहे. त्यामुळे आपण कोणताही गैरव्यवहार करणार नसल्याचे पाहता विरोधकांनी आकसापोटी हा ठरावा आणला आहे.पण हा ठरावच बेकायदेशीर असल्याने आपण याविरोधात अपिलात जाणार असल्याचे सरपंच राजेश मोकल यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.








Be First to Comment