सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।
कुंभार समाजाचे आराध्य दैवत श्री. संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या ७०४ व्या पुण्यतीथी दिनाचे औचित्य साधुन रविवार दिनांक ९ मे रोजी श्री.संत शिरोमणी गोरोबा काका मित्रमंडळ-कुंभार आळी यांच्या विद्यमानाने कोरोना सारख्या महाभयंकर विषाणुचा सामना करत असताना मास्क आणि सँनिटायझरचा वापर करून सर्वच नागरिकांना ह्या महामारी सोबत दोन हात करून सामना करण्यासाठी मंडळाच्या वतीने हँण्ड फ्री सँनिटायजहर स्टैंड तसेच सर्वांना मास्कचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य मोहनजी नागोठणेकर, ग्रामस्थ मंडळ कुंभार आळीचे अध्यक्ष संतोष नागोठणेकर, तसेच ग्रामपंचायत माजी उपसरपंच सुनीलजी लाड जेष्ठ समाजसेवक, श्रीधर नागोठणेकर, विजय नागोठणेकर, अनिल नागोठणेकर, सुधीर वाडेकर तसेच विद्यार्थी उन्नती संघाचे अध्यक्ष श्री.दिपक वाडेकर, रोहीदास हातनोलकर, ग्रामस्थ मंडळ कुंभार आळीचे उपाध्यक्ष श्री.अमोल घोसाळकर, किरण लाड, संत शिरोमणी गोरोबा काका मित्रमंडळाचे अध्यक्ष रुपेश नागोठणेकर तसेच मंडळातील सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी शैलेश म.नागोठणेकर यांच्या सहकार्याने राजनजी उपाध्ये, टाईड वॉटर लि. कंपनी (विडॉल ऑइल) यांच्या मार्फ़त १०० मास्क उपलब्ध झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे माजी अध्यक्ष श्री.प्रमोद नागोठणेकर यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळातील सर्व पदाधिकारी आणि सभासदांनी मोलाचे सहकार्य केले.








Be First to Comment