सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
कोरोना महामारीच्या काळात अनेक संकट तरी देखील नागरिकांना स्वतःच्या जीवाची पर्वा नसल्याचे दिसून येत असल्याचे सर्वत्रच चित्र पहावयास मिळत आहे कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी अनेक नागरिकांसाठी देशात व राज्यात तसेच जिल्हास्तरावर अनेक उपाय योजना केल्या जात आहेत त्याला नागरिकांकडून केराची टोपली दाखवत असल्याचे चित्र कोलाड नाक्यारील गर्दीमुळे पहावयास मिळत आहे .
देशात व राज्यात पुन्हा दुऱ्यांदा उद्धभवलेल्या कोरोना लाटेचा पादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर केले आहे त्यातच गर्दी टाळण्याचे आव्हान देखील केले आहे. सध्या जिल्ह्यात कोरोना संसर्गाची रुग्ण संख्येत होत असलेली प्रचंड वाढ त्यातच मृत्यू दर वाढलाअसल्याचे लक्ष्यात घेत मागील ८ एप्रिल पासून पुढे पाच दिवस रोहा शहर बाजार पूर्ण बंद ठेवण्यात आल्याने आता थेट मुबंई गोवा महामार्गावरील आंबेवाडी कोलाड नाक्यावर नागरिकांची आफाड गर्दी होत असल्याचे प्रशासकीय यंत्रणेच्या नियमावलीचे तीन तेरा वाजवत प्रचंड वहानांसह नागरिकांची गर्दी पहावयास मिळत असून मोठा धोका उद्धभवण्याची शक्यता वर्तवली जात आहे .
रोहा तालुक्यातील कोरोना संसर्गाचा पादुर्भाव रोखण्यासाठी रोहा शहर बाजारातील सर्व दुकाने बंद ठेवण्याची अमलबजावणी रोहा नगरपालिका व प्रशशकीय यंत्रणेने घेतली मात्र आता काही नागरिक थेट कोलाड गाठत असून या ठिकाणी गर्दी होऊ लागत असल्याने या गर्दीवर नियंत्रण कोणाचे असा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहिला आहे .
शासनाच्या नियमाप्रमाणे सकाळी ७ ते ११या वेळेतच आत्यावशक दुकाने खुली असतात त्यात तोंडावर मास्क नसलेल्या नागरिकांवर दंडात्मक कारवाही केली जाते मात्र विकेंड लॉकडाऊन मध्ये आंबेवाडी कोलाड नाका कडकडीत बंद आहे असे अनेकदा निदर्शनास येत असून देखील या ठिकाणी होत असलेल्या आफाड गर्दीमुले कोरोना संसर्गाचा धोका उद्धभवण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.








Be First to Comment