सरपंच ताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम
सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।
वासांबे मोहोपाडा ही तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत आहे.या ग्रामपंचायतीच्या सरपंच ताई पुंडलिक पवार यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवार दि.10 मे रोजी दुपारी ग्रामपंचायत फंडामधून सिसीटीव्ही कॅमेरा , तलावालगत पेव्हर ब्लॉक रस्ता,तसेच आदिवासी बांधवांना 15 निधीतून भांडी वाटप करण्यात आले.त्यांनी सामाजिक उपक्रम राबवून आपला वाढदिवस साधेपणाने साजरा केला.
वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत अनेक गावे व वाड्या वस्त्या आहेत.या ग्रामपंचायत हद्दीतील लोकसंख्या जवलपास 53000 हजारांच्या आसपास आहे.वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच ताई पुंडलिक पवार यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोहोपाडा राजिप शाळेजवळ तीन सिसीटीव्ही कॅमेरे बसविले असल्याने तळेगाव पाणशिल हून येण्याजाणा-या नागरिकांवर,मोहोपाडा स्मशानभूमी कडे जाणा-या नागरिकांवर,मोहोपाड्याकडून सेबीकडे तसेच तलावालगतच्या नागरिकांवर तिसऱ्या डोल्याची नजर राहणार आहे.तसेच मोहोपाडा आरोग्य उपकेंद्र लगतचा नाला ते गणपती घाट या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले असून रस्त्याचे काम सुरू केले आहे .तसेच मोहोपाडा ग्रामपंचायत कार्यालयात पंधरा टक्के निधीतून आदीवासी बांधवांना जेवणाच्या भांड्याचे वाटप करण्यात आले.




याप्रसंगी सोशल डिस्टिंक्शनचे पालन करण्यात आल्याचे दिसून आले.याप्रसंगी पंचायत समिती सभापती वृशाली ज्ञानेश्वर पाटील,सरपंच ताई पुंडलिक पवार, उपसरपंच राकेश खारकर,माजी सरपंच संदिप मुंढे, माजी सरपंच कृष्णा पारंगे,माजी सरपंच भाग्यश्री पवार, जिल्हा परिषद माजी सदस्य सुरेश म्हात्रे,माजी उपसरपंच दत्ता शिंदे, ग्रामपंचायत सदस्य संतोष मैंदर्गींकर, स्वप्निल राऊत, पुंडलिक पवार आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन संतोष चौधरी यांनी पाहिले.








Be First to Comment