Press "Enter" to skip to content

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेतर्फे आरोग्य केंद्रात वस्तूंचे वाटप

सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

संपूर्ण जगभरात कोरोनाची महामारी देशात व राज्यात पुन्हा महाभयंकर उद्धभवलेल्या करोनासारख्या संकटाचा सामना करण्याकरिता व त्याला हद्दपार करण्यासाठी आव्हानात्मक परिस्थितीला सामोरा जाण्यासाठी समाजातील काही घटक आपापल्यापरिने मदतीचा हात देत आहेत.

समाजाच्या जडणघडणीत ज्याची खऱ्या अर्थाने महत्त्वाचा सहभाग असणारा घटक तो म्हणजे शिक्षक. हे शिक्षक आपल्या मूळ अध्यापनाचे काम ऑनलाइन आणि ऑफलाईन शासनाच्या अतिशर्ती नुसार सांभालत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपले जीव धोक्यात घालून स्थानिक पातळीवर प्रशासकीय यंत्रणेला मदत व कामे करताना दिसत आहेत. एवढेच नव्हे तर सढळ हाताने आता या परिस्थितीला सामोरे जात स्वखर्चाची निधी संकलित करत आर्थिक मदतीचा हात देखील पुढे करीत असल्याचे चित्र सदरच्या स्तुत्य उपक्रमातून दिसून येत आहे.

संपूर्ण राज्यभरात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेने कोरोना हद्दपार करण्यासाठी आता पुन्हा भरारी हाती घेतली असून आरोग्य यंत्रणेला उपाय योजना म्हणून रायगड प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र असलेले रोहा तालुक्यातील रोहा, आंबेवाडी, कोकबन, नागोठणे, आशा आरोग्य उपकेंद्रात राजेशजी सुर्वे राज्याध्यक्ष व संजयजी निजापकर जिल्हाध्यक्ष यांच्या संकल्पनेनुसार जिल्हाभरात संघटनेच्या वतीने वैद्यकीय उपकरणे व साहित्य विविध ठिकाणी वाटप करण्यात आले.

१०मे २०२१ रोजी उप जिल्हा रुग्णालय रोहा अधीक्षक डॉ अंकिता खिरकर रोहा पं सं उप सभापती रामचंद्र सकपाळ ,पं सं सदस्य सौ सिद्धी संजय राजीवले, गटविकास अधिकारी किरण पाटील , सहायक गटविकास अधिकारी पंडित राठोड,गटशिक्षणाधिकारी सादूराम बांगारे , प्रशासन अधिकारी कवितके, आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ कृष्णा चव्हाण,डॉ अंकिता भोईर , आंबेवाडी सरपंच सरपंच सुरेश महाबळे, उप सरपंच श्रीकांत चव्हाण उपस्थित होते तसेच कोकण विभाग प्रतिनिधी उमेश महाडेश्वर सह आदी मान्यवरांच्या उपस्थित रोहा तालुका विभागाचे अध्यक्ष खेमसिंग चव्हाण, कार्यवाह सुभाष कांबळे, आशिष पवार, सुदाम लांडे, जिल्हा प्रतिनिधी प्रदीप खाडे ,गजानन जाधव,नंदकुमार तेलंगे, अमोल राठोड, बडे, नाईकडे ढवळे आणि इतर शिक्षक संघटनेचे पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात वस्तूंचे वाटप करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना रोहा शाखेच्या वतीने व तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना एकत्रित येत प्रत्येक शिक्षकांनी स्वेच्छेने दिलेली रोख मदत घेऊन तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांना ऑक्सिमीटर, थर्मल स्क्रिनिंग गन, बीपी ऑपरेटिंग मशीन, ग्लुकोमीटर ,फोर इन वन स्टिमर ,हॅन्डग्लोज ,आणि प्रत्येकी पाच लिटरचा सॅनिटायझर भरलेला कॅन अधिक मास्क आशा प्रकारच्या अतिशय गरजेच्या उपाय योजनेच्या वस्तू या शाखेच्या वतीने आरोग्य केंद्रास भेट देण्यात आल्या आहेत .

तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांनी व शिक्षकांनी स्वेच्छेने जमा केलेली रक्कम रु. ३५००० व अजूनही मदतीचा ओघ सुरूच आहे. त्यातील दहा टक्के भाग हा जिल्ह्याकडेही पाठविण्यात येत आहे. संघटनेतर्फे सर्व देणगीदार शिक्षकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून कोरोना निधीबाबत प्रत्येकाला पावती देण्यात येणार आहे व ही पावती इन्कम टॅक्ससाठी वापरता येईल तसेच ल महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद रोहा शाखा व तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनेतील शिक्षकांचे मे महिन्यातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला जाणार असल्याची माहिती संघटनेच्या रोहा तालुका विभागाचे अध्यक्ष खेमसिंग चव्हाण यांनी दिली.

केवळ आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेतून तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांचा व शिक्षकांचा मदतीचा ओघ सुरु असल्याने विविध स्तरातून व स्थानिक पातळीवर तसेच तालुकास्तरावर शिक्षण विभागातून त्यांचे कौतुक होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.