ॲट्रॉसिटीची धमकी देऊन दुसर्यांची जागा बळकवण्याचा प्रयत्न
सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।
तुपगाव येथील हनुमंत गुरव यांच्या 29 वर्षांपासून नावे असलेल्या जागेवर कोरोना काळात काहीही न सांगता दादागिरी करून बांधकाम करण्याचा प्रयत्न झाल्याने हनुमंत गुरव यांनी तुपगाव ग्रामपंचायत व खालापूर पोलिस ठाण्याला पत्र दिले असून न्यायालयात प्रकरण दाखल केले आहे.


तुपगाव येथे हनुमंत गुरव यांच्या पत्नी जयश्री हनुमान गुरव यांच्या नावे 100 बाय 100 अशी सर्वे नं.185 जागा आहे.सदर जागा चौक ग्रामपंचायत अस्तित्वात असताना दि.17 आॅगस्ट 1993 रोजी ठराव नं.60/12 ग्रामपंचायत ठरावात त्यांचे नावे असून गेल्या 29 वर्षांपुर्वी या जागेत आंब्या पेरूची झाडे लावून हनुमंत गुरव देखभाल करीत आहेत.शिवाय हनुमंत गुरव यांची हलाखीची परिस्थिती असल्याने त्यांनी काहीअंश घरपट्टी खालापूर तालुका विधी सेवा प्राधिकरण न्यायालयात जमा केली होती.परंतु मागील वर्षी कोरोना लाट आल्यापासून हनुमंत गुरव आपल्या जागेकडे फिरकले नसल्याने याचा गैरफायदा घेऊन अनिल कानू गायकवाड व त्यांच्या कुटुंबीयांनी विनापरवाना बांधकाम सुरू केले. यावेळी हनुमंत गुरव यांनी माझ्या जागेत बांधकाम का करता असा प्रश्न केला असता त्यांना ॲट्रॉसिटीची धमकी देऊन दमदाटी केली.याविरोधात हनुमंत केशव गुरव यांनी न्यायालयात प्रकरण दाखल केल्याचे समजते.


हनुमंत गुरव यांच्या नावे १०० बाय १०० मापाची कायदेशीर जागा असून ते कर भरतात.परंतु तुपगावातील भरत आपटेकर या माणसामुळे गावात तंटा निर्माण होत आहे.याच्यामुलेच गावातील शांतता लोप पावली असून गुरव यांच्या जागेवर विरोधकांना भडविण्याचा काम त्यांच्याकडून होत असल्याने या प्रकरणाचीही परिसरात चर्चा सुरू आहे.
राम पांडुरंग मोरे-मा.पोलिस पाटील
ग्रुप ग्रामपंचायत ठरावात 1993 पासून जागा आमच्या नावावर आहे.मागील वर्षांपासून कोरोना संसर्ग निर्माण झाल्याने आम्हा कुटूंबियांनी जागेकडे फेरफटका मारला नसल्याने अनिल गायकवाड यांनी माझ्या नावे असलेली जागेवर अतिक्रमण करून बळकाविण्याचा प्रयत्न केला आहे.यांना भरत आपटेकरची साथ असून भरत गोकुलाचा कान्हा आहे.गावात भांडणे लावण्याचे काम करतो.माझ्या जागेवरील अतिक्रमण विरोधकांच्या विरोधात कोर्टात अपील केला असून कोर्टाकडून स्टे मिळाला आहे.
हनुमंत केशव गुरव – मा.पोलिस पाटील








Be First to Comment