Press "Enter" to skip to content

पेणमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पोलिसांकडून संचारबंदीचे पालन करण्याचे आवाहन

सिटी बेल । पेण । वार्ताहर ।

राज्यात एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तर दुसरीकडे लसीकरणासाठी लांबचलांब रांगा पेण तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शहरामध्ये 7 ते 11 या दरम्यान अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी ठेवण्यात आली असली तरी अनेक दुकाने त्यानंतरही सुरू असल्याने मागिल चार दिवसांपासून शहरात नागरीकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

त्यामुळे तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाल्याने आज पेण पोलिस ठाण्याचे साहायक पोलिस निरिक्षक संतोष पिंपळे यांनी स्वता 11 वाजता संपूर्ण शहरातील अनेक भागात पोलिस व्हॅनच्या माध्यमातून दुकानदारांसह नागरीकांना संचारबंदीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन केले असता तात्काळ नागरीकांनी गर्दी कमी केली.

त्यामुळे अशा पोलिस अधिकाऱ्याची शहरातील नागरीकांकडून स्तुती होत आहे. पेण मध्ये आतापर्यंत 6 हजारांच्या वर कोरोना रुग्ण संख्या गेली आहे. लाॅकडाऊनच्या या संचारबंदीत पेण तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.शहरात विनाकारण फिरणा-यांवर तसेच 11 वाजण्याच्या नंतरही दुकाने उघडी ठेवणा-यांवर नगरपालिकेच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.त्यामुळे पेण शहरातील कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन अतोनात प्रयत्न करीत आहे. मात्र याकरीता नागरीकांची साथ महत्वाची असल्याचे प्रतिपादन साहायक पोलिस निरीक्षक पिंपळे यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.