Press "Enter" to skip to content

गुन्हा

गुन्हा

बांधलेली मीच होते त्याच खांबाशी पुन्हा
खांब तो होता बदलला काय हा माझा गुन्हा

बंध ते असुनी जुने का दुःख ते माझ्या मना
सावरूनी चालते मी काय हा माझा गुन्हा

सापडावे वाटताना नेमक्या वळणावरी
हरवले माझ्यात मी ही काय हा माझा गुन्हा

भोवताली किर्रर्र झाडी भासे होती वेगळे
शोधिले साऱ्यात ते मी काय हा माझा गुन्हा

विसरले धागे जूने नी सोबतीला नव नवे
मन कधीचे जीर्ण झाले काय हा माझा गुन्हा

सई मराठे, पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.