Press "Enter" to skip to content

खालापूरकरांनी घालून दिला आदर्श : क्वाॅरटांईन कुटूंबाला अंत्यसंस्कारा वेळी मदत

सिटी बेल । खालापूर । मनोज कळमकर ।

कोरोना दुस-या लाटेत राज्यात राजकारणाने गाठलेली हिन पातळि खालापूरच्या माञ वेशीबाहेरच असून क्वाॅरटाईन कुटूंबातील व्यक्तीच्या कुटूंबातील व्यक्तीचा मृत्यूनंतर सर्वपक्षीय राञी अपराञी धावून गेल्याने अंत्यविधी पार पडला.

खालापूर कुंभार आळीतील एका कुटूंबातील आई आणि मुलगा कोरोना बाधित असल्याने होम व्काॅरटांईन होते.याच कुटूंबातील मुलाचे वयोवृद्ध वडिलांचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. राञीचे  अकरा वाजता ओढावले संकटाची कल्पना गावातील तरूण होतकरूना मिळाल्यानंतर मदतीसाठी धावाधाव सुरू झाली.खालापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे शिंदे यानी खालापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी किटा उपलब्ध करून देण्याची सोय केली.पीपीई किट, रूग्णवाहिकेची सोय झाली. 

अत्यंतविधीसाठी लागणारे लाकडासाठी शेकापचे माजी नगरसेवक संतोष जंगम यांनी  त्याच्या सहकारी  मार्फत फोन करून लाकडांची व्यवस्था करून दिली.  लाकडांची जी व्यवस्था करण्यात आली होती ती आणण्यासाठी कुंभार आळीतील रहिवाशी भाजप शहर अध्यक्ष राकेश गव्हाणकर,  लहू दिसले  ,रोशन गव्हाणकर  खोपोलीला गेले.

स्मशानभूमीत प्रेत नेण्यासाठी नगरपंचायतीची रूग्णवाहिका बोलावण्यात आली.शिवसेना युवा नेता पाटील नितिन यांच्या मदतीला अनिल वाघरे आणि चेतन चव्हाण यांनी पीपीई किट घालून प्रेत राञी दोन वाजता स्मशानभूमीत नेले. मोजक्या ऊपस्थितीत सर्व नियम पाळत अग्निसंस्कार पार पडले.एकिकडे कोरोना कुटूंबाला एकप्रकारे वाळित टाकले जात असून अनेक ठिकाणी अंत्यसंस्काराला विरोध होतो.परंतु खालापूर शहरातील  संतोष जंगम ,सोमवंशी ,सुनील वाघरे,दीपक चव्हाण ,संतोष चव्हाण,आतिष खेडेकर, नगर पंचायत कर्मचारी तुषार धाडवे आणि चेतन चव्हाण,रोशन गव्हाणकर, राकेश गव्हाणकर,लहू दिसले,ऋषिकेश दिसले,शैलेश पंडित, अनिकेत पंडित, प्रथमेश पंडित या सर्वानी  मदतीसाठी धाव घेत अजूनहि माणुसकी शिल्लक असल्याचे दाखवून दिले.

पोलीस निरिक्षक अनिल विभुते यानी खालापूर नागरिकांचे विशेष कौतुक करत सर्वानी अनुकरण करा असा संदेश दिला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.