Press "Enter" to skip to content

पक्ष्यांबाबत भूतदया दाखवून केली पाणी पिण्याची व्यवस्था


सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।

पक्ष्यांबाबत भूतदया दाखवून रोहे तालुक्यातील वाशी येथील बाळ शिवप्रेमी वाशी आणि शिववंदना वाचनालय
यांच्या माध्यमातून ऊन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी मिळावे यासाठी पाण्याचे व्यवस्था करून पक्ष्यांबाबत भूतदया दाखविण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे.

आपल्या आजूबाजूच्या परिसरात अनेक छोटे मोठे पशु पक्षी आहेत मार्च,एप्रिल व.मे महिन्यामध्ये वाढती उष्णता यामुळे सर्वत्र पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते.याच कालावधीत जलस्त्रोत हे आटले जातात.त्यामुळे पक्षी आणि इतर जंगली प्राण्यांना पिण्यासाठी कुठेच पाणी मिळत नसल्याने हे दोन-तीन महिने त्यांच्सासाठी अत्यंत कठिण असतात.पाण्यासाठी पक्ष्यांची भटकंती सुरू असते.परंतू कुठेच पाणी नसल्याने पर्यायाने अनेक पक्षी पाण्याअभावी म्रुत्यू पावतात.पक्ष्यांची ही केविलवाणी अवस्था पाहून अनेक पक्षीप्रेमी तसेच पर्यावरणप्रेमी नागरिक व संस्था पक्षी व प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करीत असतात. त्याच धर्तीवर वाशी येथील बाळ शिवप्रेमी वाशी आणि शिववंदना वाचनालय यांच्या माध्यमातून ऊन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी मिळावे यासाठी व्यवस्थापन करण्यात आले आहे.

या उपक्रमात़ंर्गत त्यांनी रिकाम्या पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या तसेच ड्रम यांचा वापर करून त्यांना दोरीच्या सहाय्याने गावाच्या आजूबाजूच्या परिसरात दोरीच्या सहाय्याने झाडांना टांगून त्यामध्ये दाना पाणी भरण्याचा नित्यक्रम सुरू केला.या उपक्रमाचा चांगला फायदा होत असल्याचे शिववंदना वाचनालयाचे प्रमुख प्रशांत बेर्डे यांनी आपल्या उपक्रमाबाबत माहिती देताना सांगितले आहे. दररोज मोठ्या संख्येने विविध जातीचे पक्षी आमच्या परिसरात आम्ही ठिकठिकाणी ठेवलेले पाणी पिण्यासाठी येत असल्याचे सांगितले. तर आमचा हा उपक्रम छोट्या स्वरुपात असून पुढे आणखी मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात येऊन पक्ष्यांना खाद्य व पाणी कसे मिळेल हेच आम्हा सर्वांचे उद्दिष्ट असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.