सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।
रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी काढलेल्या सूचनेनुसार कर्जत उपजिल्हा रुग्णालय कोव्हीड सेंटर असल्यामुळे तेथे लसीकरण करता येणार नाही. त्यामुळे कर्जत शहरातील लसीकरण केंद्र बंद आहे. यामुळे नगरपरिषद हद्दीतील नागरिकांची गैरसोय होणार आहे. नगरपरिषदेच्या वेगवेगळ्या भागात चार लसीकरण केंद्र सुरू करावीत अशी मागणी नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.
रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी काढलेल्या सूचनेनुसार कर्जत उपजिल्हा रुग्णालय कोव्हीड सेंटर असल्यामुळे तेथे लसीकरण करता येणार नाही. फक्त प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे लसीकरण करण्यात येणार असून जिल्हा परिषद केंद्र व उपकेंद्र आपल्याकडे नसल्याने कर्जत नगरपरिषद आणि वैद्यकीय उपजिल्हा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण करणे बाबत कर्जत नगरपरिषद कार्यालयात बैठक आयोजित केली होती यावेळी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, गटनेते नितीन सावंत, विरोधी पक्ष नेते शरद लाड, तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सि. के. मोरे उपस्थित होते. लसीकरण केंद्र सुरू करून नियोजन करणे बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली, नगरपरिषद हद्दीत चार लसीकरण केंद्राची मागणी या बैठकीत करण्यात आली.
त्यामध्ये गुंडगे, भिसेगाव प्रभागासाठी जुने स्टँड परिसरातील नगरपरिषदेचे गाळ्या मध्ये, कर्जत शहर आणि मुद्रे विभागासाठी अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला, व शारदा मंदिर शाळा आणि दहिवली विभागासाठी डोंबे शाळा येथे लसीकरण केंद्र करण्याबाबत मागणी करण्यात आली.लागणाऱ्या वस्तू , पाणी किंवा इतर उपायोजना, याबाबत नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने सर्व सोय व्हावी यासाठी सकारात्मक निर्णय बैठकीत घेण्यात आला.








Be First to Comment