शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष तालुका प्रमुख किरण काशिनाथ हडप यांची मागणी
सिटी बेल । काशिनाथ जाधव ।
पाताळगंगा ।
सध्या कोरोना हा विषाणू मोठ्याप्रमाणावर फेलावत आहे.यामुळे रुग्णाला लवकरात – लवकर रिपोर्ट हवे असते यासाठी खाजगी लॅब येथे जात असतात.किंवा ‘क्ष’किरणे एक्सरे काढावे लागत आसतात.मात्र काही वेळा आपल्या लॅब मध्ये आलेल्या रुग्णाकडून जास्तीत जास्त बील उकलली जातात.परिणामी यांची माहिती त्या रुग्णाला वेळेत मिळत नाही.मात्र प्रत्येक खाजगी लॅब असलेलेल्या तेथील व्यवस्थापक यांनी नाम फलक स्वताचे नाव त्याच बरोबर विविध चाचण्यासाठी किती पैसे अकारले जातील यांचे फलक लावल्यास रुग्णाच्या खिश्याला बसलेली कात्रीला लगाम लागेल.
आजची स्थिती खूप गंभीर असून प्रत्येकजण स्वताची काळजी घेत असतो.मात्र कोणता आजार केव्हा होइल यांची शास्वती नसते.यामुळे डॉक्टर कडे गेल्यास विविध एक्सरे किंवा रक्ताच्या विविध चाचण्या काराव्या लागतात.मात्र आपला पेशेंट लवकर बरा व्हावा या दृष्टीकोणातून काही ठिकाणी वाजवी पेक्षा जास्त पैसे आकारले जात असतात.मात्र ते होवू नये प्रत्येक नागरिक यांना समजले पाहिजे की कोणत्या चाचण्याला किती दर घेतला जातो.मात्र तसे बोर्ड पहावयास मिळत नाही.मात्र या ठिकाणी लॅब असून सर्व प्रकारच्या चाचण्या केल्या जातील मात्र पैसे किती आकारले जातील यांचे मात्र तपशिल नसते यामुळे रुग्णांची मोठी फसवणूक होवू शकते.
आज प्रत्येकांची स्थिती उत्तमच आहे असे नाही.या कोरोनांच्या विषाणू मुळे लॉकडाउन झाले यामुळे अनेकांच्या नोक-या गेल्या त्याच बरोबर अनेक जण बेरोजगार झाले.यामुळे खिशातले असलेले पैसे संपले त्यातच हा आजार गंभीर असल्यामुळे प्रत्येक लॅब च्या मालकांने विविध चाचण्याचे तर निश्चित करुन फलक लावावे अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष तालुका प्रमुख किरण काशिनाथ हडप हे करीत आहे.








Be First to Comment