Press "Enter" to skip to content

रवि डायवेअर कंपनीच्या कामगारांना १० हजार रूपयांची पगारवाढ

कोरोना काळातही तब्बल १० हजार रूपये पगारवाढ : महेंद्रशेठ घरत यांचा करीष्मा

सिटी बेल । कामगार प्रतिनिधी ।

सगळीकडे मंदीचे सावट असताना, कामगारांना नोकरी टिकविने जिकरीचे होत असताना, कामगार व कंपनी यांची योग्य सांगड घालत कामगार नेते महेंद्र घरत यांनी रवि डायवेअर कंपनी तळोजा, मधील कामगारांना १० हजार रूपयांची पगारवाढ मिळवून दिली. या मध्येच महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्व कौशल्य दिसून येते.

हे कामगार मागील पंचवीस वर्षापासुन महेंद्र घरत यांच्या न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचे सभासद आहेत. एकाच संघटनेचे सलग पंचविसवर्ष सभासद असणे हा एक उच्चांक आहे.

संघटना सातत्याने कामगारांना स्वाभिमानाने जिवन जगण्यासाठी प्रयत्न करत असते. माझे सर्व सहकारी हिच माझी ताकद आहे. त्यामुळेच न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेची घोडदौड कोरोना काळातही सुरू आहे. असे महेंद्र घरत यांनी यावेळी सांगितले. संघटनेतर्फे रविडाय वेअरच्या कामगारांसाठी केलेला हा सहावा ऐतीहासीक करार आहे.

करारनाम्यानुसार कामगारांना १० हजार रूपये पगारवाढ, १८ हजार ते २० हजार बोनस, दिड लाख रूपयांची मेडिक्लेम पॉलिसी, त्याच बरोबर इतर सोई सुविधा देण्याचे मान्य करण्यात आले आहे.

या करारनाम्याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष, कामगार नेते महेंद्रशेठ भरत, सरचिटणीस वैभव पाटील, व्यवस्थापनातर्फे डायरेक्टर विकास सरोगी, एच. आर मॅनेजर एलुरकर कामगार प्रतिनिधी वसंत मुंबईकर, जयदास गोंधळी आदी उपस्थीत होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.