Press "Enter" to skip to content

कळंबोली येथे रक्तदान शिबिर संपन्न

सिटी बेल । कळंबोली । सुनिल ठाकुर ।

बांधिलकी प्रतिष्ठान आणि निर्धार सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि महाराष्ट्र दिन विशेष दिनांक ०२ मे, २०२१ वार रविवार रोजी गणेश मंदिर, कळंबोली येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले.

कोविड – १९ च्या परिस्थितीमध्ये राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून तो कमी करण्यासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीरास उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. एकूण 71 जणांनी या शिबिरात रक्तदान केले. रक्तदानाचे खरे शिलेदार हे रक्तदातेच असतात याची पुन्हा एकदा प्रचिती आली. एमजीएम रक्तपेढीच्या अंतर्गत नवी मुंबई ब्लड बँकेचे सहकार्य मिळाले. तसेच अष्टविनायक मित्र मंडळ, सिद्धराज हौसिंग सोसायटी यांचे जागेसाठी सहकार्य मिळाले. या शिबीरास बांधिलकी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष पल्लवी निंबाळकर, खजिनदार विशाल कावरे, उपसचिव स्वप्नील मुटके व सदस्य अशोक घाडगे, वर्षा मोटे, गीतांजली सावंत, सोमनाथ मोरे, श्रीगणेश रुपनवर, प्रतिक्षा कापरे, श्रद्धा वाघमारे, सिद्धी वाघमारे, राहुल चव्हाण उपस्थित होते.

निर्धार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश आहेर, उपाध्यक्ष शुभम वाळके व सदस्य मंगेश शिंदे, अनिल कुंभार, अभिषेक शिंदे, पंकज साळवे, रुपेश दाते, अनुजा माने, किसन माने उपस्थित होते. सुरक्षेचे नियम पाळून शिबीर यशस्वीरीत्या पार पडले. भविष्यात रक्तदानाची ही मोहीम अशीच अखंडपणे चालू ठेवण्याचा सर्वांनी मानस व्यक्त केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.