सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
सोल्वे स्पे इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रोहा यांच्यातर्फे रोहा तालुक्यातील पहुर ग्रामपंचायतीला ५००नग मास्क व ३० लिटर सॅनिटायझर देण्यात आले.
यावेळी पहूर ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश कदम यांनी मास्कचे वाटप पूर्ण गावाला केल्याचे सांगितले. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक सर्व सदस्य उपस्थित होते.
सध्या कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न अनेक शासकीय अधिकारी करत आहेत. डॉक्टर, परिचारिका त्यांचे सहकारी जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस मेहनत घेत असून नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर आवश्य करून विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन सरपंच मंगेश कदम यांनी केले.








Be First to Comment