आमदार महेंद्र थोरवे यांचे प्रयत्न यशस्वी
सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।
कर्जत नगरपरिषद हद्दीतील दहिवली परिसरातील विकास कामांसाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी महानगर विकास प्राधिकरण यांच्याकडून 17. 80 कोटींच्या कामांची प्रशासकीय मंजुरी घेतली आहे.
कर्जत नगर परिषद हद्दीतील दहीवली परिसरातील विकास कामे होणे गरजेचे आहे, परंतु नगरपरिषदेची आर्थिक परिस्थिती बेताची असून अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने नगरसेवक संकेत भासे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे विकास निधी मिळावी अशी मागणी केली होती त्यानुसार आमदार महेंद्र थोरवे यांनी राज्याचे नगर विकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार करून यासंबधी मागणी केली होती.
मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एम एम आर डी ए ) माध्यमातुन 17.80 कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
नगरपरिषद क्षेत्रातील दहिवली येथील तातेर फ्लोरंसकडून इंजीनियरिंग कॉलेजकडे जाणारा रस्ता तयार करण्यासाठी 4.50 कोटी, मौजे दहीवली येथील जुने वेणगाव कडे जाणारा रस्ता बांधकाम करण्यासाठी 4.30 कोटी, मौजे दहीवली येथील तातेर समर्थ नगर व सुयोग नगर येथील अंतर्गत रस्ता बांधकाम व गटार तयार करण्यासाठी 4.50 कोटी, मौजे दहिवली येथील पेट्रोल पंप समोरील मुख्य रस्ता रुंदीकरण व अंतर्गत बांधकाम करण्यासाठी 4.50 कोटी अश्या चार कामांसाठी 17.80 कोटींचा कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.








Be First to Comment