Press "Enter" to skip to content

वहाळ पंचायत गण आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सिटी बेल । उरण । सुनिल ठाकूर ।

शिवसेना वहाळ पंचायत समिती गण आयोजितउलवे नोड येथे भव्य रक्तदान शिबिर एम. जी एम. हॉस्पिटल पनवेल यांच्या सहकार्याने उलवे येथील शगुन व्हाइट वूड येथे आयोजित करण्यात आले होते . त्याला शिवसैनिकांनी उदंड प्रतिसाद दिला.

शिबीराचे उद्घाटन रायगड जिल्हा शिवसेना सल्लागार ज्येष्ठ नेते बबनदादा पाटील यांचे हस्ते झाले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायगड जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा शिवसेना संघटक सदानंदराव भोसले पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ शेठ पाटील, पनवेल तालुका संघटक मर्फी शेठ क्रियाडो, उप तालुका प्रमुख हनुमान भोईर, वहाळ पंचायत गण विभाग प्रमुख सुनिल पाटील, वाहतूक सेनेचे कार्याध्यक्ष पी .एस. मुंगाजी, उलवे शहर संपर्क प्रमुख उत्तम कार्यक्रमाचे निमंत्रक उलवे शिवसेना शहर प्रमुख प्रथम शेठ पाटील आदी मान्यवरांसह रक्तदाते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान असुन राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय ना. उध्दव साहेब ठाकरे यांचा आदेश शिरसावंद्य मानून शिवसैनिक विभागवार ह्या कोरोणा महामारी उग्र रूप धारण केले असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात रक्तदान करून शिबिरे यशस्वी करत आहेत रायगड जिल्हा प्रमुख तथा आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या सूचनेनुसार विभागवार रक्तदान शिबिराचे आयोजन केले त्याला शिवसैनिकांनी उदंड प्रतिसाद दिला असे जिल्हा संघटक सदानंद राव भोसले यांनी सांगितले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहर प्रमुख मनोज घरत, वहाळ शिवसेना शाखा प्रमुख सुधीर शेठ घरत, युवा सेना उलवे शहर प्रमुख ऋषिकेश म्हात्रे, शाखा प्रमुख सुरी गौर, शाखा प्रमुख प्रल्हाद पाटील, उप विभाग प्रमुख पंकज पाटील, शान पाटील, बामण डोंगरी शाखा प्रमुख शरद पाटील, राकेश वेदांते आदी मान्यवरांसह शिबीर यशस्वी करण्यासाठी रक्तदान करणारे कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.