ऊन पावसाच्या त्रासापासून प्रवाशांची सुटका
सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।
कर्जत रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक वरील कल्याण दिशे कडील सुरू असलेले शेड चे काम अखेर पूर्ण करण्यात आले आहे. यासाठी पाठपुरावा करणाऱ्या पंकज ओसवाल यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आणि कर्जतकर प्रवाशांची उन्हाळा व पावसाळ्यातील त्रासातून सुटका झाली.
कर्जत रेल्वे स्थानकावर शेड चे काम कित्येक दिवसापासून सुरू होते. ते कधी पूर्ण होईल या बाबतीत प्रवासी वर्गात चर्चा सुरू होती. हे काम खूपच मंद गतीने सुरू असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करीत होते.
या बाबतीत कर्जत येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे कर्जत रेल्वे स्थानकातील क्रमांक एक वरील शेडचे काम केव्हा पूर्ण होईल? या बद्दल विचारणा केली असता रेल्वे प्रशासनाने सदर काम मार्च 2020 अखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे. असे कळविले होते. त्यावेळीही काम पूर्ण झाले नाही.
ओसवाल यांनी पुन्हा रेल्वे प्रशासनास या कामाच्या निविदा प्रमाणे काम केव्हा पूर्ण झाले पाहिजे होते आणि सदर काम निविदा मध्ये ठरवून दिलेल्या तारखे पर्यंत पूर्ण होत नसेल तर या बाबतीत काम उशीर का होत आहे ? त्याचे स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. या बाबतीत रेल्वे प्रशासनाने ओसवाल यांना उत्तर देताना असे कळविले आहे की कर्जत रेल्वे स्थानकातील शेड चे काम हे सदर कामासाठी काढलेल्या निविदे प्रमाणे ऑगस्ट 13, 2019 पर्यन्त पूर्ण झाले पाहिजे होते. तसेच या कामाला उशिरा झाला कारण मध्यंतरी जोरदार पाऊस झाल्यामुळे व त्या जागे मध्ये पाणी साचल्यामुळे सदर कामांसाठी विलंब झोला असल्याचे रेल्वे प्रशासनाने ओसवाल याना काळविले होते. तसेच रेल्वे प्रशासनाने असेही काळविले आहे की सदर कामांसाठी जसा निधी उपलब्ध होईल त्या प्रमाणे काम केले जाणार आहे. असेही कळविले होते.
ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरूच ठेवला. त्यावेळी सदर काम मार्च 2021 पर्यंत पूर्ण होईल असे कळविले होते. मार्च 2021 संपत आला तरी कामाबाबत काहीच हाल चाल दिसत नव्हती. शेवटी ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे आपला पाठपुरावा सुरूच ठेवल्याने हे काम दिनांक 5 एप्रिल 2021 ला सुरु होऊन मे 2021 ला पूर्ण होईल. असे कळविले. त्यानुसार शेडचे काम पूर्ण झाल्याने कर्जतकर प्रवाशांचा ऊन, पावसाचा त्रास संपला आहे.








Be First to Comment