65 रक्तदात्यांनी दिले रक्तदान : आमदार बाळाराम पाटील यांनी दिली शिबीरास भेट
सिटी बेल । कळंबोली । विकास पाटील ।
शेतकरी कामगार पक्ष कळंबोली शहर व पुरोगामी युवक संघटना कळंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने आज 1 मे रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र दिन, कामगार दिन तसेच शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते संजय म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी 65 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे प्राथमिक.व माध्यमिक विद्यालय से .1ई नविन इमारत कळंबोली येथे हे शिबीर संपन्न झाले.


या शिबिराला आमदार बाळाराम पाटील,नगरसेवक तथा शेकाप पमपा जिल्हाध्यक्ष गणेश कडू, नगरसेवक शंकर म्हात्रे, यांनी भेट दिली. तर शिबीर यशस्वी करण्यासाठी शेकाप कळंबोली चिटणीस तथा नगरसेवक गोपाळ भगत, नगरसेविका प्रिया भोईर, विजय भोईर, संजय म्हात्रे, संजय सागर, भाऊसाहेब रवंदल, रमेश गावंड, एम आर कदम, एम जी एम कामोठे ब्लड बँकेचे डाॅ किशोर काळे व त्यांची टिम आदींनी मेहनत घेतली.
आपण सारेच सध्या कोरोना माहामारीला सामोरे जात आहोत कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक बेड,ऑक्सिजन, आवश्यक औषधे ,रक्त, प्लाझ्मा वेळेवर उपलब्ध होत नाहीत त्यामुळे आपलेच मित्र व नातेवाईक, याना मृत्यूस सामोरे जावेच लागत आहे. बेड,ऑक्सिजन, औषध आपण पैशाने खरेदी करू शकतो .काही प्रमाणात रक्त ही खरेदी करू शकतो परंतु सध्याची परिस्थिती पाहता सर्व सामान्य रूग्णांना हे शक्य होत नाही. त्यामुळे रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे आवाहन शासन देखील करत आहे.त्या नुसार शेतकरी कामगार पक्ष /पुरोगामी युवक संघटना कळंबोली च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रक्त दात्यानी चांगला प्रतिसाद दिला.
गोपाळ रामा भगत
चिटणीस -शे.का.पक्ष कळंबोली शहर
नगरसेवक -पनवेल महानगरपालिका








Be First to Comment