रोहा तालुका महिला राष्ट्रवादी पक्षा तर्फे उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे सॅनिटरी नॅपकिनचे वाटप
सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
राज्यमंत्री तथा पालकमंत्री अदिती ताई तटकरे यांच्या मार्गदर्शना नुसार तसेच रोहा तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या महिला अध्यक्षा सौ प्रितम पाटील यांच्या पुढाकाराने रोहा तालूका महिला राष्ट्रवादी पक्षा तर्फे महिला कोरोना रूग्णांसाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे सॅनिटरी नॅपकिंग वाटप करण्यात आले.
सध्या कोरोना विषाणूची दुसरी लाट सुरु असुन दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून त्याला आला घालण्यासाठी अनेक संघटना कडून विविध प्रकारचे प्रयत्न सुरु आहेत.अशा वेळी रोहा तालुका राष्ट्रवादी महिल अध्यक्षा सौ.प्रितम पाटील यांच्या पुढाकाराने व रोहा तालुका महिला राष्ट्रवादी पक्षा तर्फे रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या कोरोना महिला रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून महिला रुग्णांसाठी सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून ते वैद्यकिय अधिकारी अंकिता खैरकर यांच्या कडे सपूर्द केले.
यावेळी महिला तालूका अध्यक्षा सौ.प्रितम पाटिल वैद्यकिय अधिकारी खैरकर ,रोहा शहर युवती अध्यक्ष रुचीरा जैन,सोनाली वाचकवडे उपस्थित होत्या.








Be First to Comment