सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।
एकिकडे वाढत जाणारी महागाई तर दुसरीकडे कोरोनाचे संकट.या कोरोना महामारीने अनेकांचे रोजगार हिरावून घेतले आहेत.त्यातच प्रत्येकाची स्थिती उत्तम असते असे नाही.ग्रामीण भागातील अनेक गोरगरीब कुटूंबाना हक्काचा आधार देणारे कसलखंड येथील नितिनदादा पाटील यांचा वाढदिवस ठिकठिकाणी विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
वाढदिवस म्हणजे आपल्या जीवनातील मोठा आनंदाचा दिवस, प्रत्येक जण हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात.परंतु कोरोना पाश्र्वभूमीवर वाढदिवस थाटामाटात न करता नितिनदादा पाटील यांनी विविध उपक्रम राबवून साधेपणाने साजरा केला.त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोहोपाडा येथील शिवभोजन केंद्रावर जवलपास तीनशे गरजू गोरगरीबांना मोफत शिवभोजन थाली वाटप करण्यात आल्या.

वाढदिवसाच्यानिमित्ताने प्रत्येकाची भूक मात्र शांत झाली याचेच नितिनदादा पाटील यांना समाधान ौमिळाले.तर अजिवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ क्टर ,नर्स व कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व एन-95 मास्कचे वाटप करण्यात आले.तसेच पनवेल तालुका पोलिस स्टेशन व पत्रकार मित्र यांना सॅनिटायझर व एन-95 मास्कचे वाटप करण्यात आले.तर काही गरजूंना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.कोरोना लाॅकडाऊनमध्ये जिवनावश्यक वस्तू मिळाल्याने गरजूंच्या चेह-यावर समाधानाचे वातावरण दिसून आले.








Be First to Comment