Press "Enter" to skip to content

कोलाड-खांब परिसरात तसंतास बत्ती गुल, नागरिकांकडून तीव्र संताप


सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

रोहा तालुक्यातील कोलाड खांब परिसरातील लाईट काल रात्री साडेतीन तास बंद केल्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागल्याने या परिसरातील नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

गुरुवार दि.२९ एप्रिल २०२१ रोजी कोलाड खांब परिसरातील लाईट रात्री १० वाजल्या पासुन १.३० वाजेपर्यंत बंद करण्यात आल्याने या परिसरातील असंख्य नागरिक घराच्या बाहेर तीन ते साडेतीन तास लाईटची वाट पाहत बसून होते.या विषयी चौकशी करण्यासाठी कोलाड महावितरण कार्यालयात फोन केला केला असता फोन बंद अथवा फोनचे उत्तर मिळत नव्हते.तसेच सतत लाईट येणे जाणे यामुळे विधुत उपकानावर परिणाम झाला असल्याचे दिसून आले.

पोलावरून लाईट बंद झाल्याची तक्रार दिल्यानंतरही पाच ते सहा दिवस लाईट सुरु केली जात नाही परंतु लाईट बिल भरण्यासाठी एक दिवस उशीर झाला तर ज्यादा कर विज ग्राहकाला भरावा लागतो. परंतु विज ग्राहकांने लागोपाठ दोन लाईट बिले भरली नाहीत तर त्या विज ग्राहकाची लाईट त्वरित बंद केली जाते.

एप्रिल ते मे महिन्यात वातावरणाचा पारा ४५ ते ४८अंशापर्यंत चढलेला असतो त्यामुळे नागरिकांना प्रचंड गर्मीचा सामना करावा लागतो त्यातच कोरोना महामारीचे संकट यामुळे लाईट गेली तर त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.अशा वेळी काल तीन ते साडेतीन तास लाईट बंद केल्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला असून यामुळे असंख्य नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

वारंवार लाईट बंद केल्यामुळे याची चौकशी महावितरण कार्यालयात फोन करुन केली असता फोन ही उचलले जात नाही मग लाईट बिले भरण्यासाठी उशीर झाला तर त्या विज ग्राहकाची लाईट कट केली जाते याची खंत वरसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तुकाराम सानप यांच्याकडून केली जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.