Press "Enter" to skip to content

क्लॅरिअंटने रोठ बुद्रुक गावात केली फवारणी, सामाजिक बांधिलकीतून पुढाकार

सिटी बेल । धाटाव । शशिकांत मोरे ।

धाटाव औद्योगिक वसाहतीतील क्लॅरिअंट केमिकल्स इंडिया लिमिटेड या प्रगतशील उद्योगसमूहाच्या वतीने परिसरात कोव्हीड चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून कारखान्या लगतच्या रोठ बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीमध्ये संपूर्ण गावाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.

रोठ बुद्रुक मध्ये काही कोरोना बाधित आढळल्याच्या पार्श्वभूमीवर गार्मपंचायतीचे सरपंच नितीन वारंगे यांनी गावात फवारणी करणेबाबत क्लॅरिअंट प्रशासनाला विनंती केली. त्याला तात्काळ प्रतिसाद देत क्लॅरिअंट व्यवस्थापनाने आज संपूर्ण गावात फवारणी करून दिली.

यावेळी ग्रमपंचायतीच्या वतीने सरपंच नितीन वारंगे, ग्रामपंचायत सदस्या सौ वैभवी भगत, राजेश भगत तर क्लॅरिअंट व्यवस्थापनाच्यावतीने एच आर व प्रशासन विभाग प्रमुख उदयन बडकस, सीएसआर समितीचे सुनील दळवी व पराग फुकणे उपस्थित होते.
दरम्यान क्लॅरिअंटच्या या सकारात्मक प्रतिसादाबद्दल सरपंच नितीन वारंगे यांनी क्लॅरिअंट प्रशासनाचे आभार मानले आहेत. तर उदयन बडकस यांनी साईट हेड अभिजित दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील कोव्हीडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी क्लॅरिअंट प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.