Press "Enter" to skip to content

चांदोरकर बाई यांच्या प्रथम जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

सिटी बेल । रायगड । अमूलकुमार जैन ।

चांदोरकर बाई यांच्या प्रथम जयंतीनिमित्त राहुल चांदोरकर व परिवार यांनी ग्रुप ग्रामपंचायत नागांव सभागृह येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते.
आदरणीय चांदोरकर बाईंना श्रद्धांजली देत सरपंच निखील मयेकर व आतापर्यंत ४२ वेळा रक्तदान केलेले नागाव ग्रामस्थ पंकज महाजन यांनी रक्तदान करून शिबिरास सुरवात केली.

त्यावेळी श्री.श्रीकांत आठवले, सौ.हर्षदा मयेकर, श्री अभय मोडक व ग्रामस्थ उपस्थित होते. एकूण ६५ रक्तदात्यांनी आज रक्तदान केले.

रक्तदान करणाऱ्या प्रत्येकास एक झाड भेटवस्तू म्हणून दिले. अशा प्रकारे जयंती साजरी करून राहुल चांदोरकर व परिवाराने समाजा पुढे एक आदर्श निर्माण केला आहे असे सरपंच निखिल मयेकर यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.