Press "Enter" to skip to content

पेण नगरपालिकेचे जपली सामाजिक बांधिलकी

आमदार रविशेठ पाटील यांच्या आमदार निधीतून नगरपालिकेद्वारे लोकार्पण केलेली रुग्णवाहिका आता रुग्णांसाठी मोफत सेवेला

सिटी बेल । पेण । प्रशांत पोतदार ।

पेण तालुक्यात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येत गरिब गरजू घटकाला त्वरीत उपचारासाठी लागणाऱ्या रुग्णवाहिकेचे काही दिवसांपूर्वी पेण सुधागड मतदार संघाचे आमदार रविशेठ पाटिल यांच्या आमदार निधीतून अद्ययावत अशा रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले होते.

यावेळी पेण तालुका व नगरपालिका हद्दीतील कोरोना रुग्णांसाठी अल्पदरात हि सेवा दिली जात होती. मात्र आमदार रविशेठ पाटिल तसेच नगराध्यक्षा प्रितम पाटिल यांनी गरीब व गरजू रुग्णांवर त्वरीत उपचार होण्यासाठी अल्पदरात देण्यात येणारी रुग्ण वाहिकेची सेवा आता नगरपालिकेद्वारे मोफत सुरुवात केली आहे.

या रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना उपचार घेण्यासाठी एखाद्या हॉस्पिटल पर्यत जाने हे मोफत होणार आहे.यासाठी नगरपालिका आरोग्य अधिकारी शिवाजी चव्हाण ७२७६२२०७१०,९२२२०९४०८३ व ९३९०५९८५५९९ रुग्णवाहिका चालक गुरु सुर्वे यांचे भ्रमणध्वनी संपर्क नंबर देण्यात आले आहेत.

तर नगरपालिकेने आमदार निधीतून रुग्ण सेवेसाठी देण्यात आलेली रुग्णवाहिका हि २६ तारखे पासून रुग्ण सेवेसाठी मोफत सेवा देत असल्याचे आरोग्य अधिकारी शिवाजी चव्हाण यांनी सांगितले.


Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.