Press "Enter" to skip to content

खासगी सुरक्षारक्षकांचे लसीकरण प्राधान्याने करण्याची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान गेल्या पंचवीस वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात विविध सांस्कृतिक आणि समाजोपयोगी उपक्रम राबवित आहे. मागील वर्षी कोविड १९ मध्ये पुणे पोलीस आणि इतर संस्थांच्या मदतीने सामाजिक उपक्रम राबविले आहेत. सध्या कोविड १९ च्या काळामधे सर्व सरकारी यंत्रणा, डाॅक्टर, नर्सेस, पोलीस, सामाजिक संस्था इत्यादी वेगवेगळ्या प्रकारे सेवा बजावत आहेत.

सर्व प्रकारच्या बँका, मेडिकल, गृहनिर्माण संस्था, व्यापारी संस्था, कारखाने, आय टी कंपनी, शाळा, काॅलेज, हाॅस्पीटल, माॅल, बाजार समिती या व अशा अनेक संस्थेमधे सुरक्षा रक्षक कामाला असतात. सदरहू ठिकाणी कोणी व्यक्ती आल्यास त्याचा सगळ्यात पहिला संपर्क त्या ठिकाणी सुरक्षेकरीता ठेवण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकाशी येतो. असे सर्व सुरक्षा रक्षक खर तर फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून काम करीत असतात. या सर्व सुरक्षा रक्षकांच्यासाठी जर व्यापक प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवली गेली तर त्याचा नक्कीच फायदा समाजाला होईल.

या संदर्भात अनेक डाॅक्टरांशी विचार विनिमय करून आपणांस हे पत्र देत आहोत.
सदर लसीकरण मोहीमेसाठी खालील संस्था या सर्वतोपरी मदत करण्यास तयार असून आपण जर या मोहिमेत पाठिंबा दिला तर शासन दरबारी पाठपुरावा करून याबाबत लागणा-या सर्व परवानग्या शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही प्राप्त करू.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी खालील संस्थानी मंजूरी दिली आहे. तसेच आणखी काही संस्थांशी बोलणं सुरू आहे..
●संचेती हाॅस्पीटल, पुणे
●मोरया हाॅस्पीटल, दापोडी
●युनिकेअर हाॅस्पीटल, चाकण
●श्रीपाल हाॅस्पीटल, बारामती
●दत्तात्रय वळसे पाटील हाॅस्पीटल, बोपोडी
●विघ्नहर्ता हाॅस्पीटल, शिरूर
●विघ्नहर नर्सिंग होम, नारायणगाव

शासन/ पोलीस /हाॅस्पीटल आणि शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान असा संयुक्त आपल्याला पुढील काही महिने राबवणे शक्य होईल. आपण जर पाठिंबा दिला तर प्रायोगिक तत्वावर पुणे शहर, पुणे जिल्हा आणि नंतर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयात असा उपक्रम राबविणे शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानला सहज शक्य आहे.असे निवेदन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी दिलै.

यावेळी उपाध्यक्ष नंदकुमार बंड, समन्वयक संदिप राक्षे उपस्थित होते. खाजगी सुरक्षारक्षकांचे लसीकरण लवकरच होणार असल्याचे रायगड जिल्हा अध्यक्ष मोहन लबडे व जिल्हा सचिव राकेश खराडे यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.