Press "Enter" to skip to content

पंचशील नगरला जंतुनाशक सॅनिटायझर फवारणी

सिटी बेल । पनवेल । वार्ताहर ।

पंचशील नगर रहिवाशी सामाजिक समिती तर्फे नागरिकांच्या आरोग्य हिताच्या दृष्टीने पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्था नवीन पनवेल चा सामाजिक उपक्रम जंतुनाशक सॅनिटायझर फवारणी करण्याचे काम केले. 27 व 28 एप्रिल दोन दिवस फवारणी संपुर्ण पंचशील नगर झोपडपट्टी परिसर सॅनिटायझर फवारणी करून लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वपुर्ण काम केले आहे.
 

या जंतुनाशक फवारणीसाठी पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेचे  अध्यक्ष शंकर वायदंडे, उपाध्यक्ष अशोक आखाडे,सचिव राहुल पोपलवार, खजिनदार भानुदास वाघमारे, संघटक कैलास नेमाडे, आदी बरोबर अविनाश पराड व करण बोराडे यांनी विशेष मेहनत घेऊन ही फवारणी केली आहे.

यावेळी संस्थेचे सदस्य हेमा रोड्रिंक्स, संतोष ढोबळे,संजय धोत्रे, अजय दुबे,रामदास खरात व संतोष कंठाले सहकार्य लाभले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.