Press "Enter" to skip to content

कोरोना लढाईत खाकी वर्दी बनली सर्वसामान्य जनतेसाठी देवदूत

खालापूर पोलीस निरिक्षक अनिल विभुते यांची पाच गाव दत्तक संकल्पना

सिटी बेल । खालापूर । मनोज कळमकर ।

कोरोना लढाईत गेल्या वर्षभरापासून कर्तव्य बजावत असलेल पोलीस दल आता ब्रेक द चेन साठी पूर्ण तयारिनीशी उतरला असून खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अनिल विभुते यांनी संकल्पनेतून पाच गावे दत्तक घेण्यात आली आहेत.

दत्तक गावामध्ये माडप,नारंगी, भिलवले, शिरवलीवाडी व  केलवलीचा समावेश आहे.या उपक्रमाचा शुभारंभ बुधवारी माडप गावापासून झाला.यावेळी पोलीस निरीक्षक अनिल विभुते ,पंचायत समिती ऊपसभापती विश्वनाथ पाटील,सपोनी संजय बांगर, महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती गायत्री जाधव, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील सावंत  पोलीस नाईक नितीन शेडगे  ,अमित सावंत, विठ्ठल घावस, तुषार आठरे कोरोना विरोधात सर्व प्रकारची लढाईसाठी पथक निर्माण करण्यात आले आहे.

या पथकात गावपातळीवर बीटअंमलदार, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, आशा कामगार, अंगणवाडी सेविका, शिक्षक, पोलीस पाटील यांचेसह ग्रामकृती दलाची स्थापना करून कोरोना आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी व त्या बाबत घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवल्या जाणार आहेत.त्यामध्ये  गावातील सर्व नागरिकांची तपासणी करण्यात येणार  असून त्यांची ऑक्सिजन व थर्मल स्क्रीनिंग तपासणी करण्याचे काम सुरू झाले  आहे.गावामध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांची संपर्क करून आवश्यक ती वैद्यकीय मदत पुरवण्यात येणार आहे. 

स्थानिक प्रशासनाचे मदतीने 18 ते 45 वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तसेच कोरोना व्यतिरिक्त इतर व्याधीने ग्रस्त असणाऱ्या नागरिकांसाठी उपचार सुविधा उपलब्ध करण्याचे काम देखील ग्रामकृती पथक करणार आहे. निराधार महिला, एकाकी राहणारे ज्येष्ठनागरिक, दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना अन्नधान्य पुरवठा करण्याची जबाबदारी देखील ग्रामकृती पथकाने घेतली आहे.

गावातील भाजीपाला विक्री व किराणा दुकानाचे ठिकाणी नागरिकांची होणारी गर्दी रोखण्यासाठी व कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सामाजिक अंतर या नियमाचे पालन करून अत्यावश्यक वस्तू वितरण याबाबतचे नियोजन करण्यात येत आहे.अशा पद्धतीने संपूर्ण कोरोना कालावधीत दक्षता घेणार असल्याचे पोलीस निरीक्षक श्री अनिल विभूते यांनी सांगितले.

कोरोना दुसरी लाट महाभयंकर असताना खाकी वर्दि पुन्हा पांडूरंगाच्या रूपात धावली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.