Press "Enter" to skip to content

कानसा वारणा फाउंडेशनच्या युवा अध्यक्षपदी अमोल असुलकर

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।

कानसा वारणा फाउंडेशनचे चौक वावर्ले येथील संस्थापक अध्यक्ष दिपकदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल असुलकर यांची नवी मुंबई युवा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.अमोल यांच्या वाढदिवसादिनीस निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अमोल असुलकर यांचा वाढदिवस दरवर्षी थाटामाटात साजरा करण्यात येतो.यावर्षी सामाजिक बांधिलकी जोपासून अगदी साध्या पध्दतीने साजरा केला.यावेली अमोल यांनी कोरोना पाश्र्वभूमीवर नागरिकांना खबरदारी म्हणून मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करावा तसेच सोशल डिस्टिंक्शनचे पालन करावे असे आवाहन केले.यावेली कानसा वारणा फाउंडेशनचे अध्यक्ष कृष्णा पाटील,युवा अध्यक्ष महेंद्र पाटील,दिपकृष्ण नागरी पतसंस्थेचे मॅनेजर तानाजी पाटील उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.