Press "Enter" to skip to content

कोरोनामुळे कुंभार समाजावर उपासमारीची वेळ : व्यवसाय आला संकटात

सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

सतत दोन वर्षापासुन कोरोना विषाणूच्या महामारीमुळे कुंभार समाजाचा व्यवसाय संकटात आला आहे. कुंभार समाजाचा व्यवसाय मुख्यतः मार्च महिन्यानंतर मे पर्यत तीन महिन्या पर्यंत सुरु असतो परंतु कोरोना विषाणू प्रादुर्भाव गेल्या वर्षी मार्च महिन्या पासुन सुरु झाला.व कोरोणामुळे सर्वत्र संचारबंदी व लॉक डाऊन करण्यात आला तसेच यावर्षीही सकाळी ७ ते ११ नंतर सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आला असुन कुंभार समाजाने बनविलेल्या मातीच्या चुली व मडके यांची विक्री न झाल्याने या समाजावर उपासमारीची वेळ आली आहे.

सध्या उन्हाच्या झळा वाढू लागल्याने या महिन्यात कुंभार समाजाचा गरिबांचा फ्रिज म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या माठाला जास्त मागणी असते परंतु कोरोना विषाणूच्या लॉक डाऊनमुळे घरोघरी जाऊन विकला जाणारा माठ विक्रीसाठी गेला नाही.तसेच यावर्षीही लग्नाच्या तारखा पुढील वर्षी ढकललेल्या परिणाम शुभ कार्याला लागणाऱ्या चुली व मातीचे मडके यांची विक्री अजिबात झाली नाही.

कुंभार समाजाचा व्यवसाय हा फक्त तीन महिने सुरु असतो पाऊसाला संपल्या नंतर दोन महिने त्यांना मडके व चुली तयार करण्यास जातात तर नंतर तीन महिने हा माल बाजारात व गावागावात जाऊन विकला जातो व याच्यावर त्यांचा वर्षाचा उदरनिर्वाह सुरु असतो.परंतु कोरोनाच्या संकटामुळे त्यांनी तयार केलेला माल तसाच पडुन आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व हाहाकार लक्ष्यात घेता मे महिन्यातही लॉक डाऊन उठवला जाऊ शकेल याची खात्री देता येत नाही.यामुळे कुंभार समाजाचा यावर्षाचाही उदरनिर्वाहचा प्रश्न अधिक बिकट बनला असुन या समाजावर उपासमारीची वेळ आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.