सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ आणि प्रोटान या संघटनेने संविधानिक म्हणजेच कायदेशीर मार्गाने आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
आरएमबिकेएसने दिनांक 19 ते 23 एप्रिल 2021या कालावधीत ज्या कार्यालयात कार्यरत आहोत त्या कार्यालयात किंवा आपल्या घरी असू तिथून काळी पट्टी बांधून,कोविडचे सर्व नियम पाळून काली पट्टी बांधून निषेध आंदोलन केले.
संविधानिक मार्गाने,कोविड चे सर्व नियम पाळून करण्यात येणाऱ्या या आंदोलनात रसायनी, खालापूर तालुक्यासह पनवेल,उरण तालुक्यातील नागरिकांनी निषेध नोंदविला. काली पट्टी बांधून निषेध आंदोलन करण्यामागचे कारण असे की,भारत सरकारने 29 कामगार कायदे रद्द केले,तीन किसान विरोधी कानून लागू केले, बहुजनांचा पदोन्नतीतील आरक्षण रद्द केले, कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना रद्द करून नवीन योजना लागू केली, सार्वजनिक उद्योग, कंपनी यांचे खाजगीकरण केले,बहुजनांचे शिक्षण व नोकरी संपुष्टात आणणारे नवीन धोरण याच्या विरोधात राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी (आरएमबिकेएस) चे उपाध्यक्ष संतोष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.








Be First to Comment